जळकोट , दि . २७ : 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फीत लावून घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला.


कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला जळकोट येथे जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.व तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली.


यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य  प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील,कृष्णात मोरे, महेश कदम, गजेंद्र ‌पाटील, राजु पाटील,बबन मोरे, बसवराज कवठे,शंकर वाडीकर, पिन्टु चुंगे,जीवन कुंभार, प्रभाकर कदम, सुनील कलशेट्टी,विजय यादगौडा, वसंत चव्हाण,लोकु राठोड, वसंत करदुरे,नसीर इनामदार, लक्ष्मण जाधव,पिन्टु कार्लै, भिमाशंकर हत्ते,आर.बी.टेलर रघुनाथ कागे‌ तसेच गावातील पुरुष महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top