वागदरी , दि .२० : एस.के.गायकवाड
देवळाली ता. कळंब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेचे उदघाटन जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या हस्ते रिपाईच्या नाम फलकाचे फित कापून शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी निवडण्यात आलेल्या शाखा कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. शाखा अध्यक्ष भालचंद्र घाडगे, उपाध्यक्ष शरद शरणांगत, सचिव बाळासाहेब एडके ,कार्याध्यक्ष तुकाराम घाडगे,आदींची निवड करून सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रिपाइंचे मराठवाडा विभाग सचिव बंडूभाऊ बनसोडे, उस्मानाबाद जिल्हा संघटक सचिव सोमनाथ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव, रिपाइं कळब तालूक अध्यक्ष शिवाजी सिरसाट,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे, शहराध्यक्ष उदय बनसोडे, शहर संघटक सचिव मुकेश मोठे, युवा नेते महादेव भोसले, आकाश जोगदंड, सुधीर बनसोडे, नामदेव गायकवाड, आमोल जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.