तामलवाडी , दि. १९
तामलवाडी ता. तुळजापूर येथे ऊळे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ,या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व द्राक्ष छाटणी पूर्व मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोळेगावचे सरपंच सुरेश डांगे तर कंपनीचे चेअरमन आप्पासाहेब धनके , प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव सांगली , तालुका कृषी अधिकारी सोलापूर सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव यांनी सांगितले की, द्राक्ष शेती ही एक दोघांनी करण्याची शेती नसून ही शेती समूहाने करण्याची शेती आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी समूह तयार करून शेती केल्यास शेती व्यवसायात योग्य प्रकारचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास तामलवाडी व ऊळे पंचक्रोशीतील द्राक्ष बागायतदार त्र्यंबक फंड ,शंकर येणेगुरे, शिवाजी पवार, यांच्यासह तामलवाडी, गंजेवाडी ,गंगेवाडी, पिंपळा बुद्रुक ,वडगाव काटी, सावरगाव, केमवाडी, कासेगाव, माळुंब्रा ,सुरतगाव या परिसरातील शेतकरी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार कंपनीचे व्हाईस चेअरमन महादेव सोनटक्के यांनी मानले.