परंडा, दि . १३ :
परंडा तालुक्यातील कंडारी येथील कानिफनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिना कोळेगाव धरणाचा साकत कॕनॉल गेला आहे .त्यामुळे भाविक व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याठिकाणी पूल बांधण्यात यावा यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार दि १३ रोजी आंबेडकर चौकातुन हलगीच्या निनादात, घोषणा देत सीना-कोळेगाव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या नेतृत्वाखाली हा सिनाकोळेगाव कार्यालयावर मोर्चा काढुन मागणीचे निवेदन संबंधित आधिकाऱ्यांना देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की, कंडारी येथील कानिफनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्यात यावा, मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे, तरी कॕनलॅवर पूल बांधल्यास भाविक, शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल.
या निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटनेचे राहुल गाढवे, विकास औवताडे, औदुंबर ठोंगे ,सचिन ठोंगे, आरपीआयचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते तानाजी बनसोडे ,कानिफनाथ सरपने ,गुरुदास कांबळे ,अमोल तिबोळे .विजय कदम, महादेव तिबोंळे ,मच्छिंद्र तिबोंळे ,शहाजान पटेल ,भाऊसाहेब तिबोंळे ,आरपीआय तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे , आमोल गायकवाड, छावा क्रांतिवीर सेवा मराठवाडा संपर्क प्रमुख आमर शेख, नागनाथ नरोटे ,विक्रम जाधव . रामदास टोपे ,प्रणजीत गवंडी , आकाश पेठे, भरत ननवरे ,खांडेकर अजित, यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .