आठ दिवसात मराठा गल्ली मधील रस्त्याचे काम झाले नाही तर शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याबरोबरच नगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवशाही तरुण मंडळाचे तानाजी जाधव यांनी दिला
मराठा गल्ली येथील रस्त्याची अतिशय मोठी दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावरून नागरीकांना चालत जाता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने या रस्त्याचे काम करावे, याबाबत शिवशाही तरुण मंडळ गेल्या चार वर्षांपासुन न.प.कडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र नगरपालिकेने गेल्या चार वर्षात या रस्त्याचे काम केले नाही. अनेकदा या रस्त्याचे काम करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने मोजमाप घेण्यात आले. मात्र त्यानंतर कुणाचा "इगो" आडवा आला माहीत नाही. या रस्त्याचे काम कांही झाले नाही. त्यामुळे शिवशाही तरुण मंडळाने सोमवार दि.१३ सप्टेंबर रोजी नगरपालिकेच्या निषेधार्थ चावडी चौक ते मराठा गल्ली पर्यंत रस्त्यावर बेशरमाची झाडे लाऊन नगरपालिकेचा जाहीर निषेध केला.मराठा गल्ली येथुन हलगी वाजवत व नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्या निषेधाचे फलक हातात घेऊन शिवशाही तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चावडी चौकापर्यंत मोर्चा काढुन नगरपालिकेचा जाहीर निषेध केला.
या मोर्चामध्ये शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, श्रीकांत सावंत, निखिल येडगे, संतोष मुळे, विजयानंद जाधव, युवराज जगताप, मनोहर जाधव, बाबुराव सुरवसे, सुरेश हजारे, शिवाजी चौधरी, तानाजी सावंत, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सुहास येडगे, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, राजेंद्र महाबोले, उमेश जाधव, गणेश मोरडे, शिवाजी सुरवसे नितीन दळवी, कुरुक्षेत्र किल्लेदार, रतीकांत नागणे, संतोष किल्लेदार, धनाजी किल्लेदार , ज्ञानेश्वर मुळे, सहदेव जगताप, अविनाश जाधव, दादा काळे, संभाजी येडगे, नेताजी जाधव, सोमनाथ पवार, सुनिल गव्हाणे, गोटू नागणे, प्रकाश जाधव, प्रदीप चौधरी, राजेंद्र किल्लेदार, मनोज जाधव, बालाजी किल्लेदार, तात्याराव जाधव, गोविंद जाधव, अमित नागणे, धनाजी जाधव, विनोद डोंगरे, तानाजी जाधव, अभिषेक सावंत, विमालबाई काळे, यांच्यासह शिवशाही तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.