अणदूर , दि .१४ 

बुधवार दि  १४  सप्टेंबर  रोजी
जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर येथे हिंदी विभागाच्या वतीने 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त शिक्षण महर्षी स्वर्गीय सि.ना.आलुरे गुरुजी यांना समर्पित हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

 या सप्ताहाचे उद्घाटन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे निवृत्त  डॉ. देविदास इंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  अणदूरचे सरपंच तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक,  रामचंद्र आलुरे, अध्यक्षस्थानी प्राचार्य  डॉ. उमाकांत चनशेट्टी , मल्लिनाथ लंगडे, अण्णासाहेब आलुरे ,लक्ष्मण बोंगरगे उपस्थित होते.

उद्घाटक डॉ. इंगळे म्हणाले की, देशाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणारी एक मात्र भाषाहिंदी आहे. ही भाषा मधुर, सरळ समजण्यासाठी सोपी आहे. सर्व भाषा श्रेष्ठ आहेत. भाषा समाजावर थोपवू नका .भाषेच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण होत असते, सहज असलेल्या भाषेचा स्वीकार करा .लोकशाही विचारावर आधारित आपला देश आहे .महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक ,सुभाषचंद्र बोस यांनी हिंदी हीच राष्ट्रभाषा होऊ शकते, देशाची गौरव वाढवू शकते. अशा प्रकारची भावना व्यक्त केली. हिंदीच्या प्रचार प्रसारामध्ये आकाशवाणी ,दूरदर्शन ,चित्रपटाचा महत्त्वपूर्ण योगदान आहे .


राष्ट्रगीत राष्ट्रध्वज या बरोबर देशाला राष्ट्रभाषेचे आवश्यकता आहे .ती हिंदीच पूर्ण करू शकते.
प्रमुख पाहुणे रामचंद्र आलुरे म्हणाले की ,हिंदी भाषेमध्ये एक प्रकारची गोडवा आहे , या भाषेत आईची माया प्रेम आहे, हिंदी स्वीकारून देशाला एकतेच्या धाग्यात बांधूया. बस, रेल्वेस्थानक , हिंदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संपर्क करणारी भाषा आहे .माखनलाल चतुर्वेदी सारखे अनेक महान कवींनी या भाषेला समृद्ध केलेला आहे.
प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, गुलशन नंदाच्या साहित्यापासून प्रेमचंद यांच्या प्रभावी साहित्याचे उल्लेख करून समाजाला दिशा देण्याचे कार्य या साहित्य मधून झालेला आहे , म्हणून साहित्य वाचा असे आव्हान केले.


या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी ,राकेश दुधाळकर, विश्वजीत कसबे ,संगणक अभियंता, योगेश खराडे ,दिलीप चव्हाण इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी  मानले.
 
Top