काटी , दि .१४ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथे सोमवार दि. 13 रोजी जिल्हा परिषद प्रशालेत येथील मायभूमी फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक व कोविड योद्यांचा सन्मान सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित होते.
अध्यक्षीय समारोपात सचिन पंडीत यांनी मायभुमी फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी व कोरोना योद्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये स्फुर्ती व चेतना आणण्याचे कार्य केल्याबद्दल सर्वप्रथम संस्थेचे कौतुक केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम अहंकाराचा त्याग करण्याची आवश्यकता असून उचित ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यानी या स्पर्धेच्या युगात कठीण मेहनत, जिद्द, व परिश्रमाच्या जोरावर उज्वल यश संपादन करण्याची गरज असल्याचे व उचित ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी योग्य क्षेत्राची निवड करुन कठीण परिश्रम करावे असे सांगुन यशस्वी जीवनातील कानमंत्र सांगितला. तसेच यापुढे मायभुमी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन योग्य दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन केले.
"युवकांसमोरील आवाहने"
यावेळी व्याख्याते डॉ.आनंद मुळे यानीं विद्यार्थ्यांना " वर्तमान व भविष्य आणि युवका समोरील आव्हाने " ह्या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याचा तरुणवर्ग सोशल मीडियाच्या आधीन गेल्याने वैचारिक देवाणघेवाण मंदावल्याची खंत करुन चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेली वाटचाल योग्य की अयोग्य तपासण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात वैभव गाटे यानीं मायभूमी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ.हिम्मत गाटे यानीं सन्मानित विध्यार्थीना आपले अनुभव सांगताना विद्यार्थ्यानी आपणास आवडेल तेच क्षेत्र निवडावे व वयाच्या 21 ते 22 वर्षांपर्यंत एमपीएससी, युपीएससीत करिअर करुन यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
यावेळी व्याख्याते डॉ.आनंद मुळे कोविड योध्दे डॉ.अजित राठोड, डॉ.हिम्मत गाटे, डॉ.राजेश पाटील, डॉ.प्रमोद अंबुरे, मुख्याध्यपक सोनवणे सर, ग्रामसेवक रमेश यलम, लँब अशिस्टंट बिभीषण गाटे, आरोग्य कर्मचारी संतोष विभुते, मेजर धनाजी गाटे, परिचारिका श्रीमती भाग्यश्री अशोक भालशंकर, आशा कार्यकर्त्या सौ.संगिता भालशंकर,अंगणवाडी सेविका सौ.शोभा काळे,सौ.अनुसया
काळे,सौ.शीलाबाई गाटे,सौ.गीता भालशंकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण गाटे यानीं केले तर आभार धनाजी गाटे यानीं मानले.