तुळजापूर , दि . १४ :
काक्रंबावाडी येथे कोळेकर महेश मित्रपरिवार यांच्या वतीने गावातील लहान मुले आणि तरुणांना कराटे प्रशिक्षण देण्यात आले.
समाजातील वाढते अपराध आणि जबाबदारी लक्षात घेता महेश कोळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काक्रंबावाडी गावातील लहान मुलांना आणि तरुणांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. जेणेकरून त्यांना समाजात वावरत असताना आपले स्वतःचे संरक्षण करू शकतील आणि आपल्या बरोबर इतरांची ही मदत करतील.
या कराटे प्रशिक्षण मध्ये मुलांना आणि तरुणांना स्वतःच आणि आपल्या बरोबर इतरांच संरक्षण कशाप्रकारे करायचं कोणत्या वेळी कोणता आक्रमक पवित्रा घ्यायचा. शत्रूवर हल्ला कसा करायचा आणि आपली पकड कशी मजबूत करायची शत्रूच्या पकड मधून कशी आपली सोडवणूक करून घ्यायची. हे शिकवण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते महेश कोळेकर यांनी राबवलेल्या उपक्रमात काक्रंबावाडी गावातील लहान मुले आणि तरुण सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे गावातील मुलांमध्ये एक नवचैतण्य निर्माण झाले आहे. आणि या उपक्रमाचे आणि महेश कोळेकर यांचे कौतुक संपूर्ण काक्रंबावाडी गावातून होत आहे.