तुळजापूर, दि . १४ :
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजी भोसले आणि सौ सुदर्शनी शिवाजी बोधले यांच्या घरी गौरी गणपतीच्या समोर तुळजापूरचा प्रसिद्घ महादेव मुद्धगुलेश्वर मंदिराचा देखावा आरसा मध्ये उभारण्यात आला. दरवर्षी बोधले परिवाराच्यावतीने महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने नेत्रदीपक आरास केली जाते. ही परंपरा या वर्षीही त्यांनी तुळजापूर तालुक्यातील मुदगलेश्वर सिंदफळ येथील महादेव मंदिर गाभारा अत्यंत हुबेहूब उभारला आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरामध्ये तुळजाभवानी देवीचे वास्तव्य असल्यामुळे येथे साजरे करण्यात येणारे सण उत्सव अत्यंत उत्साहात आणि धार्मिक परंपरा पुढे चालवत साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने शहरातील अनेक कुटुंबामध्ये अत्यंत सुबक आणि नेत्रदीपक आरास केली जाते. यामध्ये शिवाजी बोधले आणि त्यांच्या पत्नी सुदर्शन बोधले यासाठी चांगली पूर्वतयारी करून जवळपास अर्धा दिवस ही आरास करण्यामध्ये मग्न असतात. शहरांमधील महिला वर्गामध्ये हळदीकुंकवाच्या निमित्ताने बोधले परिवाराचा आरास पाहण्यासाठी लोकांना उत्सुकता असते .
सौ. सुदर्शनी शिवाजी बोधले यांनी अतिशय सुंदर शंकराची रांगोळी काढुन लोकांना मंत्रमुद्ध केले
याकामी शिवाजी बोधले, शिवांजली बोधले ,विजय बोधले, शिवांकुर बोधले, मेघराज गुरव,शशिकांत इंगळे, वैभव इंगळे या सर्वांची मदत झाली. शहरातील शुक्रवार पेठ पावणारा गणपती जवळ शिवाजी बोधले यांचे निवासस्थान आहे.