वागदरी ,दि. १४ : एस.के.गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील  वागदरी येथे आमदार राणाजगजितसिह  पाटील यांच्या हस्ते सभागृह बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.


  तुळजापूर  तालुक्यातील वागदरी येथे स्थानिक विकास निधीतून सभागृहाच्या कामाला मंजुरी मिळलेली असून सदर सभागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार राणाजगजितसिह  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिह  पाटील म्हणाले की, गावच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून सन २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्व शेकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विमा रक्कम मिळाली पाहिजे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच वागदरी येथील ग्रामदैवत श्री संत भवानसिग महाराज मंदिर व परिसरास तिर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले.  आभार  ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे यांनी केले.यावेळी जि.प.अध्यक्षा आस्मिता कांबळे, प.स.समभापती रेणुका भिवा इंगोले, उपसभापती दत्ता शिंदे, जि.प.बांधकाम सभापती देऊळगावकर,प.स.सदस्य सिद्धू कोरे, सिंदगाचे सरपंच विवेकानंद  मेलग़ीरे, वागदरीचे सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच राजकुमार पवार, ज्ञानेश्वर पाटील,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरूजी, विजयसिंग ठाकूर, ह.भ.प.सुरेशसिंग परिहार,तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर, मोहनसिंग चव्हाण, नागनाथ बनसोडे,  ग्रा.प.सदस्या विद्या बिराजदार, महिला बचत गटाच्या अध्यक्षा उज्वला वाघमारे, जलील शेख,महमद शेख, ग्रामसेवक जि.आर.जमादार आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top