काटी, दि . ०३ 

तुळजापूर तालुक्यातील  तामलवाडी ते वडगाव (काटी) रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डयात पाणी साचत आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे आल्यामुळे अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वेगात येणारे मोटारसायकलस्वार त्यात पडून जखमी होत आहेत. 


या दयनीय झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शुक्रवार दि. (3)  रोजी शिवसेवक समितीच्या वतीने  शिवसेवक समितीचे मराठवाडा अध्यक्ष निरंजन करंडे यांच्या नेतृत्वाखाली या खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले. 

       
हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा शिवसेवक समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिववसेवक समितीचे मराठवाडा अध्यक्ष निरंजन करंडे यांनी इशारा दिला आहे.  
      
या आंदोलनात निरंजन करंडे, सौदागर माळी, बबन पाटील, अमोल नलावडे, तात्यासाहेब भालेकर, हणमंत सुतार, श्रीमंत गवळी, मंगेश वासकर, तुळशीराम लोकरे, लक्ष्मण शेंडगे, बालाजी चुंगे, किरण साखरे आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.
 
Top