डॉ उमा काळे काटीकर यांची राजस्थान मधील जेजेटी विद्यापीठात संशोधक मार्गदर्शकपदी नियुक्ती
काटी , दि .०३
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा सध्या फुरसुंगी, पुणे येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. उमा उत्तम काळे (Ph.D) यांची राजस्थान मधील जेजेटी विद्यापीठात मराठी विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे.
डॉ. उमा काळे या येथील माजी सैनिक कै. उत्तम काळे यांच्या कन्या आहेत.राजस्थान मधील जेजेटी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून विद्यार्थ्यांना पारदर्शकपणे मराठी विषयाचे मार्गदर्शन करेन असे डॉ. उमा काळे यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सेवानिवृत्त शिक्षक बापुराव सुरवसे, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब भाले, करीम बेग,आदींनी अभिनंदन केले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.