तुळजापूर , दि. ०३ : 

तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित तुळजापूर येथे कर्ज तारणासाठी ठेवलेल्या धनादेशाचा दुरुपयोग करुन फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी मानेवाडी ता. तुळजापूर जि.प. प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका तथा तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सदस्या श्रीमती सुमित्रा अंगदराव पांढरे यांनी उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे   लेखी तक्रार करुन मागणी केली आहे. दरम्यान या घटनेने शैक्षणिक वर्तुळात 
जोरदार चर्चा रंगली आहे.


निवेदनात सुमित्रा पांढरे यांनी पुढे म्हटले आहे की, मि तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतपुरवठा संस्था तुळजापूर या पतसंस्थेची सभासद असुन मानेवाडी ता. तुळजापूर येथील शाळेत कार्यरत आहे. सदरील पतसंस्थेचे नियम व अटीची पुर्तता करुन रितसर पतसंस्थेला एस.बी.आय शाखा नळदुर्गचे चेक क्रमांक 753009 ते 753018 असे एकुण दहा चेक दि. 22 नोव्हेंबर 2018 रोजी नोंद करुन तारण ठेवले होते. चेअरमन व संचालक मंडळाने 4 लाख रुपये कर्ज मंजुर करून दिले. त्याकरिता नियमाप्रमाणे तारण ठेवलेले चेक पतसंस्थेच्या रजिस्टर मध्ये अनुक्रमांक 43 वर नोंद आहे. मी सध्याही पतसंस्थेचे कर्जदार आहे. कर्ज परतफेड झाल्याशिवाय चेक परत दिले जात नाहीत. त्यामुळे सर्व चेक संस्थेच्या कस्टडीत आहेत. त्यापैकी चेक क्रमांक 753018 पतसंस्थेच्या संबंधित पदाधिकाऱ्याने महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा नळदुर्ग या बँकेत स्वताच्या  वैयक्तिक  खात्याला लावून सदरिल चेक लंपास करुन पदाचा दुरुपयोग करुन वकीला मार्फत 30 जुलै 2021 रोजी नोटीस पाठवल्याचे नमुद केले आहे. 


पतसंस्थेतील माझ्या 10 चेक पैकी एक चेक वापरुन पदाचा गैरवापर करुन कस्टडीतील चेकचा वापर करुन चेअरमन, सचिव, संचालक मंडव व कर्मचारी संगणमताने वरील कृत्य केल्याचे आरोप केले आहे.

 
 या प्रकरणात जे  सहभागी असतील त्यांची चौकशी करुन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, मी एक मागासवर्गीय महिला असून मागासवर्गिय महिलेवर होत असलेल्या अन्यायाबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात यावी व मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दिलेल्या नोटीसीमुळे माझे व माझ्या कुटूंबाचे झालेल्य मानसिक त्रास व बदनामी नुकसान प्रकरणी मला न्याय देण्याची मागणी सुमिञा पांढरे या शिक्षेकेने केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस  अधिक्षक काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.


धनजय शिवाराम मुळे , चेअरमन
तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतपुरवठा संस्था 
याप्रकरणी सहाय्यक निबंधक आधिकारी  तुळजापूर यांच्यावतीने चौकशी चालु असल्याचे चेअरमन मुळे यानी सांगुन सुमिञा पांढरे याना याविषयीची माहिती दिली आहे. याप्रकरणी आधिक माहिती देण्यास त्यानी टाळले.



 
Top