उमरगा , दि . ०३ 

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीच्या अध्यक्षपदी  शिवाजी गायकवाड व सचिवपदी  सुखदेव होळीकर यांची निवड करण्यात आली आहे.

 उमरगा लोहारा तालुक्यातील मातंग समाज बांधवांची बैठक होऊन उमरगा शहरामध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे ठरले असून यावेळी एकमताने पुतळा कृती समिती स्थापन करण्यात आली. यावेळी पुतळा कृती समितीची पुढीलप्रमाणे पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी शिवाजी  गायकवाड कार्याध्यक्षपदी  बालाजी गायकवाड उपाध्यक्षपदी  राजाभाऊ शिंदे , संजय सरवदे सचिवपदी  सुखदेव होळीकर, सहसचिवपदी सतीश कांबळे , कोषाध्यक्ष बबनराव बनसोडे , सदस्यपदी सुधाकर बनसोडे , शिवाजी दुणगे , वाघबर सरवदे व सल्लागार दिलीप गायकवाड यांची निवड करण्यात आली.

 बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून संविधान बचाव परिषदेचे अध्यक्ष अशोक सरवदे  उपस्थित होते. यावेळी  निवृत्त कर्मचारी वाय,एस शिंदे, श्रीमंत दुणगे,  नागेश कांबळे ,  हे उपस्थित होते.


 अध्यक्षस्थानी शिवाजी दुंनगे हे उपस्थित होते. यावेळी अशोक सरवदे बोलताना म्हणाले , समाज संघटित होणे  ही काळाची गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीतून निर्माण करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड यांनी कसल्याही परिस्थितीत एक वर्षात अण्णाभाऊचा पूर्णाकृती पुतळा उमरगा शहरात उभा करणार अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गायकवाड यांनी , सूत्रसंचालन सुखदेव होळकर यांनी केले.  आभार केशव सरवदे यांनी  मानले . यावेळी तालुक्यातील  समाज बांधव उपस्थित होते.
 
Top