मुरूम,  दि .  २  : 

येथील महावितरणच्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मराठा सेवा संघामार्फत सलग दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती व गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या अत्यंत आणीबाणीच्या काळात व बिकट परिस्थितीत मुरूम शहर व जवळपासच्या भागातील जास्तीत-जास्त ठिकाणी वीजयंत्रणा बंद पडू दिली नाही. शहरवासीयांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. यामुळे त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महावितरणच्या कार्यालयात गुरुवारी  रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 



यावेळी सहाय्यक अभियंता एस. एन. वाघमारे (शहर विभाग), सहाय्यक अभियंता एस. आर. सागावकर (ग्रामीण), एम. मोरे, आय. सी. फंरकाडे, ए. तांबोळी, व्ही. टी. कुंभार, व्ही. जाधव, एस. एस. शिंदे, बी. राठोड, आर. कोळी (वरिष्ठ तंत्रज्ञ) एस. महिंद्रकर (कनिष्ठ तंत्रज्ञ), डी. मुळे, बी. सावंत, पी. रणसुरे, एन. शिंदे, पी. राठोड (बाह्यस्रोत तंत्रज्ञ), वि. जमादार, प्रवीण अंबुसे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर वैराळ होते. 

यावेळी एस. एन. वाघमारे, एस. आर. सागावकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, मोहन जाधव, मराठा सेवा संघाचे प्रा. दत्ता इंगळे, मार्गदर्शक विठ्ठल पाटील, धम्ममित्र राम कांबळे, एआयएसएफचे तालुकाध्यक्ष अँड. अतुल दासमे, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे अजिंक्य कांबळे, अक्षय शिंदे, टिपू सुलतान ग्रुपचे बाबा कुरेशी, अनिल पुराणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रा. दत्ता इंगळे, धम्ममित्र राम कांबळे, प्रदीप जाधव, एस. एन. वाघमारे, एस. आर. सागावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप भास्कर वैराळ यांनी केला. या कार्यकमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक मोहन जाधव तर आभार अजिंक्य कांबळे यांनी मानले.
 
Top