जळकोट,दि.२ :

  एसबीआय फाउंडेशन ,मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, येडोळा, गायरान तांडा व जकणी तांडा या पाच गावात ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत गावांमध्ये शाळा संगणकीकरण, पाणी शुद्धीकरण केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, वृक्षलागवड, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, बायोगँस, स्वच्छता विषयक मागील ४ वर्षापासून विविध कामे चालू आहेत. 

 या कामाची पाहणी १ सप्टेंबर रोजी एसबीआय फाऊंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापिका सुवीना दोंडालिंगनवार यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
 यावेळी दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक अंतर्यामी कर्जे, जॉन्सन कुजुर, प्रकल्प समन्वयक विलास राठोड, गुरुदेव राठोड, भूषण पवार, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, ग्रा.पं. सदस्य रामू चव्हाण, सिताराम चव्हाण, शेषराव राठोड, येडोळाचे सरपंच पद्माकर पाटील, ताराचंद पवार, महिला बचत गटाच्या निर्मला राठोड, सीताबाई चव्हाण, घमाबाई पवार मंजुळाबाई राठोड, रामतिर्थ जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका एस.एस.गाढवे, गायरान तांडा शाळेचे शिक्षक साहेबराव पवार, जकणी तांडा शाळेचे शिक्षक शिवाजी राठोड, फुलचंद पवार, श्रीमंत राठोड, उत्तम राठोड, बाळू चव्हाण, संजय चव्हाण ,ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top