वागदरी , दि .०२ :
तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून केलेल्या इमारतीचे बांधकाम त्वरित पाडून न.प.ने ती जागा ताब्यात घ्यावी या मागणीसह अन्य महत्त्वपुर्ण मागण्यासाठी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शासकीय जागेवर केलेले बांधकाम पाडावे व बांधकामास मंजुरी देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी मुंडे व अशिष लोकरे यांना बडतर्फ करावे, जिल्ह्यातील दादासाहेब सबलीकरण योजने अतंर्गत प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढून जमीनीचे वाटप करावे,रमाई आवास घरकुल योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करावे, मागवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी,श्रावण बाळ,संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना मानधनात वाढ करावी, आदी सह विविध मागण्या त्वरित मंजुर करण्यात याव्यात.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा संघट सोमनाथ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, उदय बनसोडे,रिपाइंचे भालचंद्र कठारे, बाबासाहेब मस्के, अरूण लोखंडे, मारुती खारवे ,अरूण कदम,आमोल कदम,वैजिनाथ पांडागळे, प्रविण बनसोडे, संपत जानराव, राजरत्न सिंगाडे, मुन्ना ओव्हाळ,प्रताप कदम, भास्कर पांडागळे,तानाजी कदम, शरनाथ कदम,सुधाकर मस्के सह कार्यकर्ते उपस्थित होते.