परंडा , दि .०२ :
वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशाने वंचित बहुजन युवा आघाडी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन युवा आघाडी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी दिलीप आडे यांची निवड करण्यात आली तर परंडा येथील युवा नेते प्रकाश बनसोडे यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत करत परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यानी प्रकाश बनसोडे यांचा हार, फेटा बांधुन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वत महासभा राज्य समन्वयक तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे, तालुका महासचिव दयानंद बनसोडे, तालुका प्रवक्ते रणधीर मिसाळ, तालुका कार्यकारिणी सदस्य अंकुश दाभाडे, किरण बनसोडे, फकीरा दल सामाजिक संघटनेचे . बौद्ध महासभेचे संदीप बनसोडे आदी उपस्थित होते.