नळदुर्ग ,दि .०२ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या नगर पालिका निवडणूकीत स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असून,त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली,व जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली असून,निवडणूकीत आघाडी-युती यावर विश्वास न ठेवता सर्व वॉर्ड मध्ये मनसेचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीसाठी प्रत्येक पदाधिका-याकड़े विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे, 

त्याच बरोबर मनसे कडून अनेकजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात अनेकांचे प्रवेश होतील,या बैठकीस जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जनहित कक्ष व विधी विभागाचे अॕड. मतीन बाडेवाले,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के,शहर संघटक रवि राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार, उपाध्यक्ष निखिल येडगे आदी उपस्थित होते.
 
Top