काटी , दि .०२ 

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे पाझर तलावातील पाण्यात बुडून एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि.1 सप्टेंबर रोजी पांगररदरवाडी येथील भिमा मारुती साळुंके वय (75) हे आपल्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांना पाणी पाजुन त्यांना धूण्यासाठी ते शेतातील पाझर तलावात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. 


मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी भिमा साळुंके यांच्या  पश्चात  पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top