काटी , दि .२९ : 

तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव शिवारात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने ओढ्याला आलेल्या पुरात एक म्हैस वाहून जावुन ती बंधाऱ्यात अडकुन मरण पावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली तर म्हशी राखणारा 17 वर्षीय गुराखी यातुन बालंबाल बचावला आहे.


तुळजापूर तालुक्यातील  सांगवी (काटी ) शिवारातील दोन मोठे तलाव तुडूंब भरून वाहू लागल्याने ते पाणी  सुरतगाव दिशेने जात आहे. त्यामुळे सुरतगावच्या ओढ्याला मोठा पुर आला . मंगळवारी दुपारी म्हशी राखणारा जयदीप आण्णासाहेब गुंड हा ओढ्या शेजारी शेतालगत म्हशी राखत असताना एक म्हैस पुराच्या पाण्यात उतरली ती वाहत जावुन बंधाऱ्यात अडकली तिचे शिंगे लोखंडी  ॲंगलमध्ये अडकल्याने तिला पाण्यामध्ये वाहत जाता आले नाही. ती जागीच मरण पावली तर गुराखी जयदिप गुंड वय 17 वर्ष  हा म्हशीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तो पुराच्या पाण्यातुन बचावला  पुराच्या पाण्यात म्हैस मरण पावल्याने पशुपालक आण्णासाहेब धोंडीबा गुंड रा. सुरतगांव यांचे  नुकसान झाले आहे. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर पंचनाम्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
 
Top