तुळजापूर,दि.५

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष शहाबाज दिवकर यांच्यावर कसारा रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता, सदरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा मिळावा, राज्यातील सर्व शासकीय ईमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावा, अशा एकुण जवळपास २२ मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरेंद्र उर्फ संतोष निकम, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, प्रदेश महासचिव रमेश देसाई व राष्ट्रीय विश्वगामी महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. मीराबाई गोसावी आदींच्या मार्गदर्शनाखाली दि.३ सप्टेंबर रोजी तुळजापूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

सदरील निवेदनावर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष चाँदसाहेब शेख, तालुका उपाध्यक्ष प्रतिक भोसले, सहसचिव संजय गायकवाड, तालुका कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रताप मोरे,  संपादक रविचंद्र गायकवाड, अमीर शेख, म मराठीचे मकबूल तांबोळी आदींच्या सह्या आहेत.
 
Top