तुळजापूर दि १६ : डॉ. सतीश महामुनी

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे जातील असा अंदाज तुळजापुरात व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका निर्धारित वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचना मिळत असल्या तरी नगरसेवकामधून या मुद्द्यावर निवडणुका पुढे जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुका होण्यासाठी यापूर्वी निवडणूक आयोगाच्या वतीने प्रभागाची रचना आणि प्रभाग संख्या निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर नगरपरिषद त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्यस्तरावर ओबीसी राजकी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करण्यात आली. यानंतर न्यायालयाकडून या मुद्द्यावर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हा मुद्दा पुरेसा असल्याचे निर्देश देण्यात आले. पुन्हा त्यानंतर बॉबीची राजकीय आरक्षणाच्या विषयावरून वेगळे मत आणि मतांतर व्यक्त होत आहेत.

तुळजापूर नगर परिषदेच्या अंतर्गत ओबीसी राजकीय आरक्षणावरून होत असताना दिसत नाही. कोणतीही परिस्थिती असली तरी आम्ही निवडणुकासाठी सज्ज आहोत अशी भावना येथील नगरसेवकांमध्ये आहे. परंतु बहुतांशी लोक या मुद्द्यावर निवडणुका घेणे अशक्य असून त्या पुढे ढकलल्या जातील असा अंदाज व्यक्त करीत आहेत. निवडणुका कोणत्या तारखेला होतील हे मात्र आजच्या स्थितीला टांगती तलवार म्हणून आहे.

तुळजापुरात ओबीसी आरक्षण या विषयावर उघडपणे कोणी बोलत नाही. कारण येथील राजकारणामध्ये यापूर्वी ओबीसी प्रभाग असणाऱ्या प्रभागांमध्ये भोपे प्रमाणपत्रा वरून अनेकांनी ओबीसी जागेवर निवडणुका लढवल्या आहेत आणि आपला कार्यकाल पूर्ण केला आहे. या स्थितीमध्ये आगामी काळात पुन्हा याच राजकीय गणिताची पुनरावृत्ती होऊ शकते.
 
Top