काटी , दि . १७
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने केमवाडी येथे बुधवार दि.16 रोजी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोव्हीशिल्डचे पहिला डोस 100 व दुसरा डोस 75 डोस देण्यात आले.
सरपंच सौ.छाया मारुती डोलारे
केमवाडी हे गाव जिल्हा सरहद्दीवर असल्याने गावाचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, वैराग ,सोलापूर परिसरात बाजारपेठेत मोठा संपर्क आहे त्यामुळे शंभर टक्के लसीकरण मोहीम राबवून गाव कोरोनामुक्त करण्याचा ग्रामपंचायतचा संकल्प आहे.
यावेळी सरपंच सौ.छाया मारुती डोलारे,उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.ए.कोठे , भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष,सामजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र डोलारे, आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल शिंदे , आरोग्य सहाय्यक साळवे, काळे यू. बी., ग्रां प.कर्मचारी नवनाथ यादव ,अशा कार्यकर्ती आशा काशीद ,अंजना ताटे , निलेश काशीद , निशांत फंड अमोल फंड,सयाजी जतकर, आदम पठाण ,संदीप थोरात, आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.