तुळजापूर दि. १६ 

तुळजापूर येथील जिजामाता नगर हडको भागातील शिवप्रताप सांस्कृतिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाच्या वतीनं उस्मानाबाद येथील मधुबन कुष्ठधाम येथे रुग्णांना गरजू साहित्याचे वाटप करण्यात आले.



 यामध्ये उबदार कपडे, चादरी, बुट, साखर,चहा पावडर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी मंडळाचे पदाधिकारी  कुणाल जाधव, अनंत शिंदे, प्रशांत भोसले,पंकज साबळे, ज्ञानेश्वर पवार, ओम कणे, मयूर गुरव हे उपस्थित होते. या मंडळाच्या वतीनं कसल्याही प्रकारची वर्गणी गोळा न करता गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे सर्व सदस्य हे विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य विकत घेतलेले आहे.

 मंडळाच्या वतीनं हडको भागा मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले असून त्या वृक्ष संवर्धनाचेही काम केलं जातं आहे मंडळ दरवर्षी वृक्षारोपण ,महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन अन्नदान विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, यासह विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं.
 
Top