तुळजापूर  दि.१५

  येथील आयसीआयसीआय बॅकेत 63 तोळे बनावट सोने तारण ठेवून बॅकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा मंगळवारी  दि.14 दाखल करण्यात आला आहे. 

 यासंदर्भात पोलीसांनी सांगितले की, सद्दाम शेख यांस मोहोळ जिल्हा सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. तसेच रसिद अल्लाउद्दीन नदाफ राहणार अरबळी तालुका तुळजापूर आणि  आणि कोंडाजी हारूण खुदादे राहणार इटकळ तालुका तुळजापूर तसेच अब्बास राजू पठाण राहणार इटकळ तालुका तुळजापूर यांस मंगळवारी  अटक करण्यात आली आहे. 


1 लाख 35 हजार 100 रूपये जप्त करण्यात आले असून बॅकेत 3 लाख 21 हजार 556 रूपये संशयित आरोपींनी बॅकेत भरणा केला आहे. यासंदर्भात बॅंकेचे व्यवस्थापक सुनील क्षीरसागर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजूम शेख, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर कांबळे तपास करीत आहेत. 
 
  
 
Top