चिवरी , दि. २९ : राजगुरू साखरे 

तुळजापूर तालुक्यातील सर्वच मंडळातील गावांमध्ये   मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने या परिसरातील हजारो हेक्टर खरीपाची पिके मुख्यता नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीनचे पीक धोक्‍यात आले आहे. 

यंदा तालुक्यात मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावर केले होती,सोयाबीनचे पीकही  चांगले बहरली होती, त्यातच मध्यंतरीच्या काळात जवळपास एक महिना पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे काही ठिकाणचे सोयाबीन करपून गेले होते, शेतकऱ्यांनी कशीबशी तुषार सिंचननानी पाणी देऊन पिकांना तळहाताच्या फोडासारखे जपले होते, परंतु मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला शेतात पाणी साचल्यामुळे कोंब फुटु लागले आहेत., आ

ता शेतातील पाणी  ओसरणार कधी व सोयाबीन हातात लागेल किती हे सांगणे अवघड झाले आहे , त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
 
Top