वागदरी , दि .२९ : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील बोरी नदीवर शासनाने खाशबाब म्हणून नवीन पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करून येथील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या वतीने करण्यात येत आहे.
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले यांनी या संदर्भात संबंधित उस्मानाबाद जिल्ह्यधिकारी याना दिलेले सूचना पत्र रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी रिपाइंच्या शिष्ठमंडळासह उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना दिले आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ म्हणाले की,येडोळा येथील बोरी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यास प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नदीला पुर येवून जर येथे जीवीत हाणी किंवा वित्त हाणी झाली तर याबाबत संबंधित आधिकाऱ्याना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
यावेळी रिपाइंचे जिल्हा संघट सोमनाथ गायकवाड, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे,तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र लोंढे, संघटक सुरेश लोंढे, येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, शाखा उपाध्यक्ष मारुती लोंढे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष नवनाथ आबा जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते.