जळकोट,दि१४ : मेघराज किलजे
येथून जवळच असलेल्या मानमोडी ता. तुळजापूर येथील आयएसओ मानांकन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांनी आपल्या गौरी गणपतीच्या आगमनानंतर , गौरी समोर विविध विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी सामाजिक प्रश्न घेऊन सजावट केली आहे.
विक्रम पाचंगे यांच्या घरी गौरी पूजनाची आरास पाहावयास मिळाली. यामध्ये सध्याच्या सामाजिक प्रश्नांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव ,लेक वाचवा लेक शिकवा, पाणी आडवा पाणी जिरवा ,नियमित मास्कचा वापर करा, सतत स्वच्छता बाळगा, महिलेचा आदर राखा ,स्त्री जन्माचे स्वागत करा. अशा विविध विषयावर रांगोळी तथा पोस्टाद्वारे पाचंगे कुटुंबीयांतर्फे प्रबोधन करण्यात करण्यात आले आहे. या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.
पाचंगे हे उपक्रमशील मुख्याध्यापक असून, शाळेत गावकरी व शिक्षकांना सोबत घेऊन विविध आतापर्यंत उपक्रम राबवले आहेत. आपली शाळा आयएसओ मानांकन प्राप्त केली आहे. त्यांना सामाजिक कामाची आवड असून शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक प्रश्नावर काम करत असतात. मानमोडी सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचा गंध नसलेल्यांना शिक्षण प्रवाहात आणून गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदवून घेण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी स्वतःच्या घरी गौरी गणपतीमध्ये विविध सामाजिक प्रश्न घेऊन त्यातून प्रबोधन केले आहे. यासाठी त्यांची पत्नी व कुटुंबीयांनी त्यांना सहकार्य केले आहे.