नळदुर्ग , दि .१४ 

शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज हिंदी भाषा दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. 


हिंदी विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध लेखनाच्या भित्ती पत्रकाचे आयोजन केले होते. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद उपपरिसर उस्मानाबादचे संचालक डॉ. डी. टी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर  होते.  व्यासपिठावर प्रा. वैभव कुलकर्णी आर्किड कॉलेज सोलापूर यांच्यासहीत उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, माजी प्राचार्य मोहन बाबरे, समन्वयक डॉ. मनोज झाडे, हिंदी विभागाचे डॉ.सुभाष राठोड, डॉ. हशमबेग मिर्झा, प्रा. संजय गोरे यांची उपस्थिती होती. 


प्रा.संजय गोरे यांनी हिंदी भाषा दिनाच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top