तुळजापूर,  दि . ३० : 

    
तुळजापूर शहराचे वैभव असलेले छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, युवा नेते विनोद  गंगणे,  मुख्याधिकारी लक्ष्मण  राठोड, सर्व नगरसेवक  , कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा  चबुतऱ्यावर  बसविण्यात  आले.
 दि . १९ जानेवारी २०१९ रोजी पुतळ्याचे रंग काम करणे तसेच  नवीन चबुतरा  बांधून सदरील परिसर  सुशोभिकरण करणे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून औरंगाबाद येथे रंग काम देण्यासाठी पाठवण्यात आला होता. 

 सदरील काम मजबूत व कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकर करण्यासाठी तुळजापूर  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदचे नगराध्यक्ष सचिन  रोचकरी सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन आज गुरुवार दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा नियोजित जागेवर  बसवण्यात आला आहे .

  
याबद्दल तुळजापूर शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर उभा करण्याबाबत नगराध्यक्ष   रोचकरी व सर्व नगरसेवक यांनी जनतेस आश्वासन दिले होते. ते त्यांनी आज पूर्ण केले आहे. याबद्दल  शहरवासीयांच्या वतीने त्यांचे अभिनंदन  होत आहे.
 
Top