नळदुर्ग , दि .१३ : एस.के.गायकवाड

येडोळा ता.तुळजापूर  येथे बोरी नदीच्या पाण्यात के.टी.बंधाऱ्या जवळ बोरीनदीवर पुलाचे बांधकाम त्वरित करुन दळण वळणासाठी कायमस्वरूपी रस्ता करण्यात याव या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शाखा येडोळा ता.तुळजापूर व समस्थ ग्रामस्थांच्या वतीने रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, युवाआघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के आदींच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोमवार दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता बोरी नदीत लक्षवेधी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.


 प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शुभासरदार जानोजीराव भोसले समाधी स्थळाचे पुजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.


याप्रसंगी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग येथून निघणारी बोरी नदी ही येडोळा गावा जवळून वहाते. पावसाळ्यात बोरी नदीला पुर आला की,येडोळा गाव ते येडोळा पाटी (कंदुरमळा) हा रस्ता बंद होऊन दैनंदिन व्यवहाराचे मुख्य ठिकाणी असलेल्या नळदुर्गचा संपर्क तुटतो. येथील ग्रामस्थासमोर अनेक अडचणी निर्माण होतात.त्यामुळे या नदीवर येडोळा गाव ते येडोळा पाटी या रस्त्याला जोडणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम त्वरित करून दळणवळणासाठी कायम स्वरूपी रस्त्याची सोय करण्यात यावी.


 यावेळी ,इंद्रजित जाधव, शाहूराज पाटील, प्रभाकर पाटील, चेतन जाधव, भाजपचे तालुका उपाध्यक्ष, नवनाथ  जाधव,बलभीम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुधीरसिंग परिहार ,अजित जाधव,लिंबराज जाधव, माजी सैनिक राजेंद्र जाधव, दिगंबर पाटील, दत्ता शेगर,पारधी संघटनेचे राज्य अध्यक्ष पंडीत भोसले,रिपाइंचे आल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीद कुरेशी, जेष्ठ कार्यकर्ते राम लोंढे ,
 तालुका संघटक सुरेश लोंढे, शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, उपाध्यक्ष मारूती लोंढे ,शाखा सचिव भानुदास लोंढे,सोपान गायकवाड, प्रविण कांबळे, लक्ष्मण लोंढे, अनिल लोंढे, रिपाइं बंजारा आघाडीचे आनंद चव्हाण ,धोंडीबा रठोड,परमेश्वर राठोड,सुरेश पवार,भूषण पवार,बाबु राठोड ग्रामसेविका एस.एस.गोरे उपसरपंच लक्ष्मी जाधव आदीसह ग्रामस्थ,महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  याप्रसंगी तहसीलदारचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार चंद्रकांत   शिंदे यानी निवेदन स्विकारले,तर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
Top