इटकळ , दि .१३ 

  इटकळ ता . तुळजापूर  येथील सज्जाचे तलाठी  प्रशांत देशमुख यांची  उस्मानाबाद जिल्ह्यात तेर येथे बदली झाल्याने त्यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाकडून भव्य सत्कार करून  शुभेच्छा दिल्या.

गेल्या चार वर्षापासुन प्रशांत देशमुख हे इटकळ सज्जा येथे कार्यरत होते. त्यांनी सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांसाठी गरजेच्या असलेल्या कोणत्याही कागदपत्रांची कमतरता भासू दिली नाही. पीक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामा करणे आणि त्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत मिळवुन देणे आदी कामे ते वेळोवेळी करत असल्याने त्यांच्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला असल्याचे मत पत्रकार  सलगरे यांनी या वेळी बोलतांना व्यक्त केले. नुकतीच महसूल प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघ व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.पाच वर्षापूर्वी इटकळ येथे तलाठी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले तलाठी रबडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अझर मुजावर , माजी सरपंच विजयकुमार गायकवाड , पोलीस पाटील विनोद सलगरे , पञकार  केशव गायकवाड , नामदेव गायकवाड , अतुल सलगरे उपस्थित होते.
 
Top