अणदूर , दि .१३ :
शिक्षणमहर्षी , माजी आमदार कै.सि.ना.आलुरे गुरूजी यांच्या ८९ व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी रविवारी तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरात ,सर्व आजाराचे ६०० रूग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
रोटरी क्लब आॕफ सोलापूर, सिद्धगंगा हाॅस्पीटल,सोलापूर,लालबहाद्दूर शास्री विद्यालय,होर्टी, सिद्रामप्पा खराडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचे उदघाटक,जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा आरती व्ही बंडी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन रोटरी क्लबच्या सेक्रेटरी रंजना शिरसाठ, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण,माजी जि.प. अध्यक्ष शिवदास कांबळे ,कोविड योद्धा विजय जाधव ,डाॅ. संजय मंठाळे ,पं.स. सदस्या सौ.शिला गायकवाड या होत्या.
प्रारंभी कै. सि .ना.आलुरे गुरूजीं यांच्या प्रतिमेचे पुजन अतिथींच्या हस्ते झाले.
उदघाटक अस्मिता कांबळे यांनी दीपप्रज्वलन करून शिबीराचे उदघाटन केले.यावेळी बोलताना अस्मिता कांबळे म्हणाल्या "सध्या आरोग्य सुविधा या महागड्या होत चालल्या आहेत, रोगापेक्षा विलाज भयानक, त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था कोलमडून गेली आहे. अशा वेळी गुरुजींना अभिप्रेत आरोग्य शिबीर घेऊन एक चांगले काम होर्टी कर जनतेने केले आहे."
ग्रामस्थ, होर्टी व रोटरी क्लबच्या वतीने सर्व अतिथींचे व डाॅक्टर मंडळींचे फेटा,शाल,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप कदम यांनी केले. शिवदास कांबळे ,मारूती बनसोडे,विजय जाधव, अस्मिता कांबळे यांची भाषणे झाली.
अध्यक्षीय समारोप आरती बंडी यांनी केला.
या शिबीरात डाॅ.शशिकांत गंजाळे, डाॅ.संजय मंठाळे, डाॅ.सौ.अपर्णा मंठाळे, डाॅ.सचिन जाधव, डाॅ.प्रसाद कुरूलकर,डाॅ.रविंद्र वानखेडे, डाॅ.वैशाली म्हसवेकर, डाॅ.नितीन बोगे, डाॅ.श्रचा शेटे,डाॅ.वैशाली जाधव, तुकाराम गायकवाड, श्रीकांत अणदूरकर, अमोल आलुरे, डाॅ.संजय कदम आदी डाॅक्टरांनी व एम.आर नी तपासणी केली व औषधे दिली. या शिबीरात स्पर्श मोबाईल मेडीकल युनिट ,सास्तुर यांचा सर्व स्टाफ व हॅलो मेडीकल फाउॅंडेशन,अणदूरचा स्टाफ मदतीसाठी उपस्थित होता. डाॅ.सिद्रामप्पा खजुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी उत्तमराव लोमटे,प्रा.अंकुश कदम,लक्ष्मण शिंदे, लखन जाधव, गोपाळ सुरवसे, सातलिंग स्वामी,दत्ता राजमाने,अशोक राजमाने,सुरेश राजमाने ,मुख्याध्यापक रविंद्र उपासे,मुख्याध्यापक विनायक राठोड,मारूती ,भैरवनाथ कानडे, गणेश खराडे, योगेश खराडे, वल्लभ खराडे,अंकुश अंगुले, महादेव पाटील, सुधाकर सगट, मन्सुर शेख, राहुल राजमाने, सय्यद ,बाबासाहेब आलुरे, प्रदीप कदम,मनोहर घोडके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप कदम यांनी तर आभार मनोहर घोडके यांनी केले.