अचलेर , दि . १३ 

उमरगा तालुक्यातील आलुर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांना जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ उस्मानाबाद यांच्या वतीने गुणवंत  शिक्षक पुरस्कार २०२१ हा उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपञ देऊन गौरविण्यात आले.  त्यांच्या पत्नी सहशिक्षिका सौ.सोनाली विजयकुमार कलशेट्टी यांनी हा सत्कार स्वीकारला. यावेळी  आमदार  कैलास  पाटील, उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष  मकरंद राजेनिंबाळकर,उस्मानाबाद तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, राजा घोडके, जिल्हा उपाध्यक्ष अँड.विशाल साखरे ,जिल्हा सचिव खोताचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके, अहिल्या काळे, महानंदा खडके, आदित्य खडके, तन्वी खडके आदी उपस्थित होते.

 
Top