लोहारा ,दि .१२ :
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने लोहारा येथे काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. हा मेळावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उस्मानाबाद जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे ,लोहारा पंचायत समिती सभापती सौ हेमलता रणखांब ,उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील ,लोहारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल पाटील ,माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे, गुंडाप्पा भुजबळ राजू तोरकडे,दत्ता पाटील, शंकर जट्टे, व्यंकट कोरे,शरणाप्पा पत्रिके, महादेव टेंगळे,शहराध्यक्ष के डी पाटील ,युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे ,विठ्ठल वचने पाटील, संगमेश्वर माशाळकर, आबासाहेब साळुंके,व्यंकट रसाळ, साताप्पा होनालकर ,सत्यवान जगताप,रौफ बागवान, रफीक शेख, हरिहाऊ गवळी, प्रभाकर हराळे, बाबा ,सूर्यवंशी रबानी नळेगावे, इस्माईल मुल्ला ,सागर पाटील, विनोद मोरे, श्रीमंत पाटील,केशव सरवदे,परमेश्वर चिकटे,राम मिटकरी,खंडेराव करोज, बालाजी भरगांडे, तानाजी माटे प्रकाश होणराव, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकेश सोनकांबळे यांनी केले