लोहारा, दि .२५
लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात इंधन बचत व पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा ही पीसीआरए व महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षातर्फे घेण्यात आली.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक केदार खमीतकर यांनी संगणकावर इंधन बचतीचे विविध चित्रफितीच्या माध्यमातून महत्व पटवून दिले. त्यांनी घरगुती ऊर्जा व्यवस्थापन अंतर्गत एलपीजी, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेल या पारंपरिक ऊर्जेच्या वापरात प्रत्येक क्षेत्रात कमीत कमी 20 टक्के बचत करण्याच्या सोप्या पद्धती या जनजागृती कार्यक्रमात घेण्यात आल्या. या निमित्त एक स्पर्धाही घेण्यात आली. विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर ऊर्जेचा अपव्यय टाळला पाहिजे व विविध उपाय योजना केल्या पाहिजेत असे मत मांडले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश जावळे पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या यु. व्ही. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. यु.पाटील, तसेच किरण खमीतकर, व्यंकटराव जावळे पाटील, दत्ताजी जावळे पाटील यांची प्रमुख उपस्तिथी होती. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.एम. एल. सोमवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डी. एन.कोटरंगे यांनी केले. समारोप इंधन सक्षम प्रतिज्ञेने झाला. यावेळी उपस्थित सदस्यांनी शासनाच्या कोविड-19 च्या नियमाचे पालन करून मास्क व सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.