तुळजापूर , दि. २५ : 


मंदीर उघडण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्यामुळे   मुख्यमंत्री ना .उध्दव  ठाकरे यांचे   शिवसेनेच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात महाआरती करुन व  पेढे वाटप करुन  आनंदोउत्सव साजरा करण्यात आला.
                      
महाराष्ट्राची कुलस्वामिनी  श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर गेल्या अनेक  महिन्यापासुन संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. गेली दोन वर्षे  कोरोना साथीच्या रोगाचा सामना तुळजापूरकराना करावा लागत असल्यामुळे येथील व्यापारी , पुजारी बांधवाचे मोठे हाल झाल्याचे सर्वश्रुत आहे. 


 छोट्या व्यवसायीकाचे मोठे हाल झाले यामुळे श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर उघडण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शिवसेनेच्या वतीने दि.२५ सप्टेंबर  शनिवार रोजी राजमाता जिजाऊ महाद्वार या ठिकाणी महाआरती करुन फटाक्याची आतीषबाजी करत भाविकांना पेढे वाटून  "जय भवानी,जयशिवाजी" असा जयघोष करीत आंनदोउत्सव साजरा करुन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. 

यावेळी शिवसेनेचे नेते  शाम पवार, सुधीर कदम पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे ,शंकर लोभे , बापुसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, जगन्नाथ गवळी , सुनील जाधव ,अमिर शेख  ,दिनेश रसाळ,  अक्षय नाईकवाडी, जयकुमार दरेकर, संजय भोसले,  चेतन बंडगर कारभारी, कैलास पवार आदीसह शिवसैनिक व पुजारी बांधव उपस्थित होते.
 
Top