जळकोट,दि.२५ :
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या म्हणीच्या विरुद्ध तुगाव जिल्हा परिषद शाळेचे चित्र आहे .
अस्वच्छ शाळा तुगावची शाळा असे म्हणण्याची पाळी आली आहे .
शाळेच्या परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे .शाळेच्या परिसरामध्ये सर्वत्र गवत व काँग्रेसगवत आहे. पाणी साचले आहे. शाळेच्या स्वच्छतेकडे शाळेचे मुख्याध्यापक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अकार्यक्षम शाळेच्या विरोधात ग्रामस्थांच्या भावना तीव्र बनल्या आहेत.
वेळीच शाळेने स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .असा इशारा जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव महेश मुसळे यांनी दिला आहे .यावेळी निवेदन देताना अक्षय हराळकर,अजय कुलकर्णी ,ओम जामगे, प्रमोद माने उपस्थित होते.