नळदुर्ग , दि .२६ : 

महाराष्ट्र  सरकारने यावर्षी ई पीक पाहणी ॲप सुरु केले आहे. महसुल विभाग व व कृषी विभागाच्या ई पीक पाहणी संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. 

तुळजापूर तालुक्यातील बोरनदीवाडी (नळ ) या भागातील शेतक-याना आष्टी येथीलल छञपती  शाहू , फुले ,  आंबेडकर  महाविद्यालयातील  कृषीदुत ओंकार प्रशांत भोसले यानी शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जावुन ई पीक पाहणी संदर्भात  प्रत्यक्ष स्वरुपात मार्गदर्शन  केले.

प्रारंभी  ग्रामस्थानी  कृषीदुत भोसले यांचे स्वागत केले. प्राचार्य  डाँ एस. आर .अडसुळ ,कार्यक्रम आधिकारी आजबे एम. ए. , यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत ओंकार भोसले यानी शेतक-याना कृषीविषयी माहिती देवुन ई पीक पाहणी कशी करावी, याबाबत माहिती दिली.यासाठी ॲपचा वापर कसा करावा,पिकाची नोंद कशी करावी ,यांचे प्रत्याक्षिक प्रत्यक्ष बांधावर जावुन केले. यावेळी  रमेश राठोड , प्रशांत भोसले , परमेश्वर पवार , हिरु पवार , अशोक धनवडे , यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 
Top