नळदुर्ग ,दि .२६ :
शहरातील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा कांग्रेसचे माजी शहराध्यक्ष जावेद वलीउल्ला काझी (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान सोलापूरातील खासगी रुग्णालयात शनिवार (२५) रात्रीनिधन झाले.
त्यांचावर शहरातील सोहेल खान कबरस्थान येथे रविवारी सकाळी अकरा वाजता दफनविधी करण्यात आला,त्यांचा पश्चात पत्नी, चार मुले एक मुलगी असा परिवार आहे, बालाघाट महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.