अक्कलकोट दि. २६ 


    कुरनुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना   तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावपातळीवरील  स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगावी..
गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, व त्यांना निवारा लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याचे फर्मान तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिले.  सांगवी बु, खु, बोरीउमरगे, यासह बोरी नदीकाठच्या सर्व गावांना तहसीलदार यांनी भेट देत आहेत.
           सध्या बोरी कुरनुर धरणातून २४०० क्यूसेक्स इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू असून, आणखीन पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे, नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे. आणि वेळोवेळी स्थानिक पातळीवरील सर्व प्रशासनाचे कर्मचारी माहिती देत राहतील तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  नागरीकांनी ही सतर्क राहावे व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पुढारी यांनी वेळोवेळी दक्षता घ्यावी ,असे आवाहन अक्कलकोट कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे.
 
Top