. तामलवाडी , दि.२६
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा २७ वा वर्धापन दिन हा सुयोग हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार हा वर्धापनदिन हा सुयोग हॉस्पिटल तामलवाडी ता. तुळजापूर येथे रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शाखाध्यक्ष ज्ञानोबा राऊत हे तर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, सुयोग हॉस्पिटलचे प्रमुख डॉ रविराज गायकवाड, डॉ स्नेहा जाधव, तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रभाकर जाधव यांनी सर्वांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या स्थापनेपासूनचा थोडक्यात इतिहास सांगितला.
जिल्हा युवक कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे व उपस्थितांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी रामेश्वर कांबळे, जिल्हा परिषदचे वरिष्ठ सहाय्यक सहदेव हब्बु, श्रीकांत कागडे, गुंडू बनसोडे, पो.काॕ शिरसट ,भोसले, राजेंद्र माळी, पत्रकार किसन पांडागळे, विनोद चुंगे , रईसा शेख, इस्माईल शेख, नाना रणसुरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.