परंडा , दि .२७
एकता फांऊडेशन व संस्कृती प्रतिष्ठान, उस्मानाबाद यांच्या वतीने दि. २६ रोजी परंडा येथीला कल्याणसागर समुहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी यांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
परंडा शहरासह तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कल्याणसागर सुहाच्या माध्यमातुन उत्कृष्ट कार्य केले आहे. शहरातील सरस्वती प्राथमिक शाळा, कल्याणसागर माध्यमीक विद्यालयातुन विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे व गाठत आहेत. याचाच एक भाग म्हणुन उस्मानाबाद येथील एकता फांऊडेशन व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने या उल्लेखनीय कार्याबद्दल कल्याणसागर समुहाच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी यांना शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले, डेप्युटी कंट्रोल ऑफ अकाऊंट्स मुंबई ज्ञानेश्वर वीर, जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे, माजी मुख्याध्यापक एम.डी. देशमुख, नगरसेवीका प्रेमाताई पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हा संकटक चिटनिस विकास कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होत.