वागदरी , दि .२७ : एस.के.गायकवाड

प्रभात मंडळ अणदुरचे ता.तुळजापूर सचिव तथा   निवृत्त मुख्याध्यापक मारुती मैलारी खोबरे  याना राज्यस्तरीय उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


  
मारुती खोबरे  याना शालेय जिवनापासूनच कुस्ती खेळाचा छंद  आहे. कुस्ती पट्टू ,वस्ताद, मल्लपंच,क्रिडा शिक्षक ते मुख्याध्यापक असा यशस्वी जिवनप्रवास करणारे मारुती खोबरे  याना जनसेवा बहुउद्देशिय शिक्षण संस्था व पैलवान रेवाप्पा सोनकांबळे प्रतिष्ठान नळदुर्गच्या वतीने पैलवान रेवाप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्काराने अणदुर येथील हुतात्मा स्मृती सभागृहात संन्मानित करण्यात आले.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आस्मिता शिवदास कांबळे  तर प्रमुख पाहुणे म्हणून अणदूर ग्रा.प.चे सरपंच रामचंद्र  आलुरे, राष्ट्रीय खेळाडू धनराज भुजबळ, प्रभात मंडळाचे अध्यक्ष महादेव नरे ,माजी जि.प.अध्यक्ष शिवदास कांबळे  आदी होते. 
    

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी कै सि.ना.अलूरे गुरुजी, व कै.पैलवान रेवाप्पा सोनकांबळे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दिप प्रज्वलन करून मारुती खोबरे गुरूजी याना फेटा, शाल,पुष्पहार, पुष्प गुच्छ,स्मृती चिन्ह, सन्मान पत्र व संविधान ग्रंथ देऊन उत्कृष्ट मल्ल पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजा सोनकांबळे  तर सुत्रसंचलन मारूती बनसोडे  व आभार  संस्थेचे सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास गवळी , भास्कर वाघमारे, लिंबराज सुरवसे,आर.एस.गायकवाड, कैलास बोंगरगे, चंद्रशेखर कंदले, भैरवनाथ कानडे, साताप्पा व्हलदुरे, व्हि.डी.पाटील, गुरुनाथ कबाडे, दयानंद काळुंके आदींनी परिश्रम घेतले.
   यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे,अँड. दिपक अलूरे,  प्राचार्य उमाकांत चनशेट्टी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिकराव अलूरे, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे,साहेबराव घुगे, महादेवप्पा अलूरे, आदीसह अणदूर व परिसरातील पैलवान, जेष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला  उपस्थित होते.
 
Top