काटी , दि . २७ :
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सौ. के. एस.के. उर्फ काकू कृषी महाविद्यालय बीड येथील कृषिदुत (विद्यार्थी) केदार विश्वनाथ तोडकरी व विवेकानंद खांडेकर या दोघांनी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांना ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष ( झीरो एनर्जी कुल चेंबर ) यावर आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतर व्हावे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागात विकास साधता यावा या उद्देशाने कृतीतून व गट चर्चेतून प्रत्यक्ष स्वरूपात मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना उर्जारहित शित कक्षाची रचना व बांधकाम करून दाखवले .त्याचा उपयोग फळे व भाजीपाला साठवण्यासाठी होतो. त्याचबरोबर शित कक्षामध्ये साठवण कशी करावी व त्याचा उद्देश, शितकक्षातील तापमान, शितकक्षाचे फायदे काय ? याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांना अभियांत्रिकी विषयाचे विषय तज्ञ एस.पी.शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. के. एस. के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.शिंदे, ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे प्रभारी प्रा.बी.डी.तायडे, डॉ. एस. पी.मोरे , डॉ. एस. एस.चव्हाण, प्रा. एस. पी.शिंदे, प्रा. एस. टी.शिंदे ,प्रा. बी. बी. तांबोळकर ,प्रा. बी. आर.चादर ,प्रा. एस. व्ही.राठोड ,प्रा. एस. एस.राठोड, प्रा. पी. बी. मांजरे, प्रा.डि.एस.जाधव, प्रा. बी. डी.बामणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकातुन मिळालेल्या माहिती बद्दल सावरगाव येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.