तुळजापूर , दि . २७ :
शासनदरबारी तुळजाभवानी मंदिर खुले करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे यांचा व्यापारी , पुजारी बांधव व राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोकुळ शिंदे दि . 23 सप्टेंबर रोजी झालेल्या मुंबई येथील बैठकीत श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविक भक्ताकरिता दर्शनासाठी खुले करावे ही मागणी मांडून मंदिर खुले करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे केली . व ती मान्यही करून घेतली. यामुळे शासनास महाराष्ट्रातील मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गोकुळ शिंदे यांनी तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुले केल्याबद्दल तुळजापूर शहरातील व्यापारी व पुजारी बांधवांकडून व राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी तुळजापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तुळजापूर शहरातील पुजारी बांधव अर्जुन साळुंखे , प्रमोद पवार, सचिन भोसले , बाळासाहेब हंगरगेकर , जटाळ कदम , पुजारी बांधव व व्यापारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील नांदुरीकर जेष्ठ नेते भारत रोचकरी , शत्रु पवार , खंडोजी जाधव , बबन गावडे, रुबाब पठाण, शहराध्यक्ष अमर चोपदार , युवक तालुकाअध्यक्ष संदीप गंगणे , युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम , युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे , गणेश ननवरे , बाळासाहेब चिखलकर , युवा नेते महेश चोपदार , उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार , शहर कार्याध्यक्ष गोरखनाथ पवार, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी , अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख तुळजापूर शहरातील व्यापारी व पुजारी उपस्थित होते.