नळदुर्ग, दि .३० :  सुहास येडगे, 

 नळदुर्ग येथील रहीमनगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम व गटारीचे काम दि. २७ सप्टेबर २०२१ पर्यंत चालू करण्याचे लेखी आश्वासन नगपालिकेने दिले होते. मात्र  प्रत्यक्षात या रस्त्याचे काम चालू करण्यात आले नसल्याने या रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा दि. ४ ऑक्टोबर रोजी पासून नगरपालिके समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आसल्याचा इशारा रहीम नगर मधील नागरीकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 


दरम्यान नगरपालिकेत कार्यालयीन अधिक्षक व मुख्याधिकारी उपस्थित  नसल्याने रहीमनगरच्या नागरीकांनी मुख्याधिकारी यांच्या खूर्चीला निवेदन दिले आहे.

या निवेदनात रहीम नगरमधील नागरीकांनी म्हटले आहे की, नगरपालिकेने दिलेली तारीख संपून गेली असून आदयाप ही कायमस्वरुपी कामाची सुरुवात झालेली नाही, यावरुन आम्हास असे निदर्शनास दिसून येत आहे की, आम्ही वारंवार निवेदन देवून व उपोषण करुनही रहीमनगरवाशियांना दुय्यम दर्जाची व सापत्न वागणूक नगरपालिका देत आहे. वास्तविक पाहता नगरपालिका हे काम करण्यासाठी दि. २७ सप्टेबर २०२१ रोजीची तारीख देवूनही या कामा विषयी पालिकेमध्ये आजूनही कोणत्याच हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात रहीम नगरच्या रस्त्याचे व गटारीच्या कायमस्वरुपी कामास प्रारंभ नाही झाला, तर येत्या चार ऑक्टोबर पासून नगरपालिका कार्यालयासमोर रहीमनगरमधील नागरीक बेमुदत उपोषणास बसणार आसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सध्या नगरपालिकेला शहरातील नागरीकांच्या मागणीनुसार विकास कामे न करण्याचा कलंक लागला आहे की काय अशी शंका नागरीकांना येत आहे. 

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी उस्मानाबाद, तहसीलदार तुळजापूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर अजीम कुरेशी, युसुफ नजीर कुरेशी, सईद हकीम कुरेशी, मुजाहिद बाडेवाले यांच्यासह अनेक नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top