इटकळ , दि .३०
दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत येडोळा ता . तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे यश.
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कुमार मधुसुदन एकनाथ नैताम या विद्यार्थ्याची जवाहर नवोदयसाठी निवड झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने मधुसूदन एकनाथ नैताम याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सदरील विद्यार्थ्यांस शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव, श्रीमती.प्रतिभा स्वामी, भरत महाबोले व आप्पाराव बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. मधुसूदन नैताम यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव ; नळदुर्ग बिटच्या विस्तार अधिकारी श्रीमती शोभा राऊत, शहापूर केंद्राचे केंद्र प्रमुख बळवंत सुरवसे यांनी मधूसुदन नैतामचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. गांव परिसरातून ही मधुसूदन वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.