काटी , दि .०७
तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव, सांगवी (काटी) येथील लसीकरणास उपसभापती दत्तात्रय शिंदे यानी सोमवारी भेटी देवुन सेवेवर असलेल्या आरोग्य अधिकारी कर्मचारी, यांचा सन्मान केला .
तुळजापूर तालुक्यातील सांगवी , सुरतगांव येथे सोमवारी . आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येकी 125 कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आल्याने दोन गावात लसीकरण शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुहास पवार यांचा सत्कार केला
तर सेवेवर असणाऱ्या
आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. सुरतगाव येथे उपसरपंच बाबासाहेब गुंड, विठ्ठल गुंड, अण्णा गुंड, राम गुंड, गजेंद्र बोचरे,महेश नकाते सांगवी येथे उपसरपंच मिलींद मगर , विश्वास मगर ,डॉ स्वाती बारस्कर ,आशा कार्यकर्ती अर्चना मगर ' अंगणवाडी कार्यकर्ती तारामती गायकवाड, सुनंदा गुंड 'सुनिता शिंदे आदी अरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते . त्याचबरोबर शिक्षक दिनानिमित्त सुरतगाव व सांगवी (काटी) येथील शिक्षकांचा सन्मान केला.